loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरोली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भागुराम तांबे

खेड - खेड तालुक्यातील साखरोली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भागूराम तांबे यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड झाली. मागील तंटामुक्त अध्यक्षपद त्यांनी उत्तमरित्या बजावल्यामुळे पुन्हा त्यांचीच ग्रामसभेत एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी यापूर्वी साखरोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून उत्तम काम केले आहे. एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्यक्ष भागूराम तांबे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावात सलोखा, शांतता राखण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या निवडीवेळी सदर सभेचे अध्यक्ष निजाम परकार, माजी उपसरपंच मुस्ताक महाडीक, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तांबे, स्वाती माहिते, रिद्धी मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते इस्माईल परकार, हनिफ दळवी, गणपत भावे, दिनेश मोडसिंग यांच्यासह महिला, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg