loader
Breaking News
Breaking News
Foto

यशासाठी जिद्द, चिकाटी आणि समर्पण आवश्यक! उद्योजक ‘एकनाथ गवस’ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; खोकरल ग्राम विकास मंडळातर्फे गुणवंतांचा गुणगौरव!

साटेली भेडशी(प्रतिनिधी)- खोकरल ग्राम विकास मंडळ, मुंबईच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री शांतादुर्गा सिद्धेश्वर मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उद्योजक एकनाथ गवस यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आई-वडिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी, त्याग आणि समर्पण हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजूबाजूच्या जगात काय घडत आहे, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्याचा प्रयत्न करा. उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाबरोबरच गावाचाही विकास साधता येतो, असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा, असे सांगत गावातील युवकांनी एकत्र येऊन छोटे-मोठे उद्योग सुरू केल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असा विश्वासही गवस यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला खोकरल ग्राम विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष श्रीपाद गवस, खजिनदार एकनाथ गवस, सहखजिनदार बाळू बिले, सल्लागार वासुदेव वर्णेकर, सुरेश साळोसकर,गंगाराम गवस, सुभाष वर्णेकर, सचिव सुनील गवस, श्री शांतादुर्गा सिद्धेश्वर मंदिर खोकरल देवस्थान कमिटी अध्यक्ष मोतीराम गवस, खजिनदार,पांडुरंग गवस, जि. प. सदस्य दीपक गवस, मंडळाचे सदस्य अशोक साळोसकर, अनिल गवस, आनंद बिले, रमेश गवस मणेरकर, सुरेश गवस, सोमा गवस, प्रभाकर नाईक, प्रशांत गवस, अशोक गवस यांच्यासह कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वर्णेकर यांनी केले. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रताप गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, एकनाथ गवस, वासुदेव वर्नेकर आणि मणेरकर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या वतीने उपस्थित जि.प.सदस्य दीपक गवस, मणेरीकर, पत्रकार शंकर जाधव व अन्य व्यक्तींचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg