loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’च्या गणपती ‘सजावट स्पर्धां’चा निकाल घोषित

रत्नागिरी, - ‘श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान’तर्फे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धां’चा निकाल आज सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आला. जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव स्पर्धेत ‘श्री सत्यनारायण उत्साही मंडळ, कुवे (ता. लांजा) या मंडळाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी साकारलेला देखावा अप्रतिम असा होता अशी एकमुखी ग्वाही परिक्षक मंडळाने दिली. सालाबाद प्रमाणे यावर्षीही मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या स्पर्धा जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव व गणेश मिरवणूक अशा तीन विभागात संपन्न झाल्या. यापैकी जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा या दोन स्पर्धांचा निकाल नियोजित कार्यक्रमानुसार शुक्र. दि. १८ सप्टें. रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. मिरवणूक स्पर्धांचा निकाल हा अनंत चतुर्दशीला होणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांचे परिक्षण केल्यानंतर म्हणजे शुक्र. दि. २५ सप्टें. रोजी रात्रौ उशिरा जाहीर करण्यात येईल, असे संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हास्तरीय सार्व. गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘श्री सत्यनारायण उत्साही मंडळ, कुवे (ता. लांजा) या मंडळाने केलेल्या देखाव्याला जाहीर करण्यात आला. या मंडळाने शिवकालीन देखावा जबरदस्त ताकदीने उभा केला आहे. या स्पर्धेतील व्दितीय क्रमांक पालघर वाडी सार्व. गणेशोत्सव मंडळाला जाहीर करण्यात आला. त्यांनी ‘उडवी माय’ (पारंपारिक शेती व सण) यावर अप्रतिम देखावा सादर केला. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक श्री रासाई उत्कर्ष मंडळ, कुवे (मावळतीवाडी) यांच्या देखाव्याला जाहीर करण्यात आला. त्यांनी सामाजिक विषय हाताळला असून समाजाला संदेश देणारा देखावा साकार केला. या स्पर्धेतील दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले असून तीन स्पर्धक गणेशोत्सवांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार परिक्षक मंडळाने एकमुखाने जाहीर केले. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतिय पारितोषिक विजेत्यांची नावे देखील यावेळी जाहीर करण्यात आली. याखेरीज घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील तब्बल १५ गणेशोत्सवांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत. तर १३ गणेशोत्सवांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या निकालाची यादी सोबत प्रसिध्द करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेसाठी खालील परिक्षकांची ३ पथके कार्यरत होती, ती पुढील प्रमाणे - गणेश परीक्षण मंडळ १) श्री. राजेंद्र नेरकर (समिती प्रमुख) २) श्री. संदीप डोंगरे ३) श्री. देवदत्त पेंडसे ४) श्री. रमाकांत पांचाळ सर ५) श्री. विनायक चव्हाण, ६) श्री. अशोक आंबवकर चिंतामणी परीक्षक मंडळ १) श्री. संजय वैशंपायन (समिती प्रमुख) २) श्री. दिपक देसाई ३) श्री. अनिल नागवेकर ४) श्री. प्रकाश शिंदे ५) श्री. विजय सुर्वे सिध्दीविनायक परीक्षक मंडळ १) अ‍ॅड.श्री. विनय आंबुलकर (समिती प्रमुख) २) श्री. दिपक राऊत ३) श्री. उपेंद्र सुर्वे ४) श्री. बबन आंबेकर ५) श्री. कैवल्य राऊत. यावर्षीच्या ‘मंगलमूर्ती मिरवणूक स्पर्धां’चा निकाल पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्र. दि. २५ सप्टें. रोजी रात्रौ उशिरा घोषित करण्यात येईल. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रवि. दि. २७ सप्टें. २०२६ रोजी सायं. ठिक ४ वा. मराठा भवन हॉल, माळ नाका, रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी सर्व पारितोषिक विजेत्यांचा आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार असल्याचे यावर्षीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg