loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी..! MLC च्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली. बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून निवडणुकांसंदर्भात कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 5 सदस्यांच्या जागेसाठी 23 ऑक्टोबर, 2026 मतदान होणार आहे विद्यमान सदस्यांच्या सेवानिवृत्तीमुळे बिहार विधान परिषदेच्या 4 पदवीधर आणि 4 शिक्षक मतदारसंघांतील 8 सदस्यांचा, कर्नाटक विधान परिषदेच्या 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांतील 4 सदस्यांचा, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांतील 5 सदस्यांचा आणि उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि 6 शिक्षक मतदारसंघांतील 11 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर , ,नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक , ,पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक होणार आहे .धिसूचना जारी करणे 29 सप्टेंबर, 2026 (मंगळवार) नामनिर्देशनपत्र (अर्ज) भरण्याची अंतिम तारीख -6 ऑक्टोबर, 2026 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी -7 ऑक्टोबर, 2026 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 9 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार), मतदानाचा दिवस - 23 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार) मतदानाची वेळ- सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 मतमोजणी - 27 ऑक्टोबर, 2026 (मंगळवार) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख - 31 ऑक्टोबर, 2026 (शनिवार)

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg