loader
Breaking News
Breaking News
Foto

कोविड काळात आरोग्यसेवा बजावणार्‍या आशा स्वयंसेविका मोहिनी मोहिते यांचा सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) - कोविड-१९ महामारीच्या अत्यंत प्रतिकूल काळात स्वतः गर्भवती असतानाही नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करणार्‍या आशा स्वयंसेविका सौ. मोहिनी मंगेश मोहिते यांचा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. यावेळी शाल, पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली गावी बौद्ध विहार या ठिकाणी प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना अभिजीत देवळेकर यांनी सौ. मोहिनी मोहिते यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg