loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचक्रोशी प्रबोधन समिती चिंद्रवळे, दोडवली, कर्दे, वाघांबेच्या प्रबोधन समिती सभागृहाचे दि.१६ सप्टेंबर रोजी उद्घाटन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वाघांबे येथे चिंद्रवळे, दोडवली, कर्वे, वाघांबे पंचक्रोशी प्रबोधन समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या "प्रबोधन समिती सभागृह" या वास्तुचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. वाघांबे येथील प्रबोधन समिती सभागृहाचे लोकार्पण सोहळा प्रबोधन माध्यमिक विद्यालय वाघांबेच्या जवळ, होणार आहे. या सभागृहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राजापूरचे आमदार किरण (उर्फ) भैया सामंत, जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडळ यांची उपस्थिती लाभणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रबोधन समिती अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती दत्ताराम निकम असणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सरचिटणीस कृष्णा वणे, कार्यक्रमाचे स्वागताअध्यक्ष प्रबोधन समिती मुंबई, कार्याध्यक्ष, सामाजिक नेतृत्व व उद्योजक अशोक येद्रे असणार आहेत. सन्माननीय उपस्थिती म्हणून गुहागर बाजार व कुणबी नागरी पतपेढी गुहागर अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, सभापती प्रणव पोळेकर, उप सभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य स्नेहा शिगवण, पंचायत समिती सदस्य संदिप गोरीवले, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा ला. गुहागर (मुंबई) चे अध्यक्ष अनंत मालप, प्रबोधन समिली मुंबई अध्यक्ष बबनराव कांबळे, ग्रुप ग्राम पंचायत, चिंद्रवळे सरपंच तेजश्री कांबळे, इमारत बांधकाम प्रतिनिधी नवनीत ठाकूर, जमीन दानपत्राने देणारे प्रतिनिधी अशोक घाणेकर आदींची उपस्थिती लाभणार आहे.

टाईम्स स्पेशल

या दिवशी दुपारी २ ते ३ वा.पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ३ वा. सभागृह लोकार्पण सोहळा, सायंकाळी ३.३० वा.पाहुण्यांचे स्वागत, दीप प्रज्वलन आणि प्रास्ताविक, सायंकाळी ४ वा. मान्यवरांचे मनोगत आभार व समारोप होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधन समिती स्थनिक व मुंबई यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg