loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शृंगारतळी बाजारपेठ फुलली; व्यापार्‍यांमध्ये उत्साह, सजावटीसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

वरवेली (गणेश किर्वे) - श्री गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत असल्याने शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. गणेश भक्तांनी शृंगारतळी बाजारपेठ फुलली होती. गणेशमूर्तींसह सजावटीचे साहित्य, पूजासाहित्य, फुलांच्या माळा, आकर्षक मखर व विद्युत रोषणाईच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत होते. घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळांकडून सजावटीसाठी विविध वस्तूंची खरेदी केली जात होती. रंगीबेरंगी मखर, तोरणे, फुलांच्या माळा, कागदी सजावट, विविध आकारांच्या लाइटिंग माळा, पडदे व इतर आकर्षक सजावटीचे साहित्याचे विक्री फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवार व रविवार सुट्टी असल्याने तसेच सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने मुंबई व पुणे येथील बहुतांश गणेश भक्त गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आले आहेत. यावर्षी सलग सुट्टी असल्याने मुंबई व पुणेकर बहुसंख्येने विविध वाहनांच्या माध्यमातून गावी येत आहेत. एसटी तसेच इतर वाहनांची गर्दी होत असली तरीसुद्धा गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत. यावर्षी पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेश स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची लगबग सुरू आहे. नारळ, सुपारी, दुर्वा, फुले, अगरबत्ती, कापूर, हळद-कुंकू, वस्त्र व पुजेसाठी लागणार्‍या अन्य साहित्याला मागणी वाढली आहे.

टाईम्स स्पेशल

सकाळच्या तुलनेत सायंकाळी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असून, वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत असला तरी पोलीस कर्मचारी चांगले काम करताना दिसत आहेत. यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वाढती वर्दळ पाहून व्यापार्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत व गणेश मंडळांमध्ये तयारी झाली असून शृंगारतळी बाजारपेठेतील शृंगारतळीच्या राजाचे दिमाखात आगमन झाले आहे. बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शृंगारतळी शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg