loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्नीची हत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केल्याने पतीला झाला कारावास, अकरा वर्षानंतर दुसऱ्या पुरुषाबरोबर जिवंत सापडली

झारखंड: प्रथम ऐकून थोडा धक्का बसेल पण ही बिहार राज्यातील घटना आहे. या घटनेने लोक हैराण झाले आहेत .अनेक वर्षांपूर्वी पत्नीची हत्या केली म्हणून पोलिसांनी पतीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले, पोलिसांच्या अहवालानुसार सदर पतीला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. अकरा वर्षे पती कारागृहातच आहे, मात्र कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पतीची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत जिवंत दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी असे म्हटले आहे की दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून जाण्यासाठी सदर महिलेने जीव दिल्याचे नाटक केले, ती बेपत्ता झाली तिचा शोध ही घेता आला नाही. तिच्या नातेवाईकांनी पतीवर आरोप केला की त्याने आमच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई केली. बिहार राज्यातील ही महिला झारखंडमध्ये सापडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील असून 2014 मध्ये एक मृतदेह सापडल्यानंतर तो मृतदेह शकुंतला देवी यांचा आहे असे नातेवाईकाने सांगितले

टाइम्स स्पेशल

पोलीस अधिकाऱ्यांनी असे सांगितले की रोहतास मध्ये शकुंतला देवीच्या भावाने 2014 मध्ये नदीमध्ये सापडलेला मृतदेह हा माझ्या बहिणीचा आहे, त्याच्या वडिलांनी ही असा दावा केला की माझी मुलगीच आहे. त्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली. शकुंतला देवींनी आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले होते की हुंड्यासाठी सासरची माणसे माझा छळ करीत आहेत त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. रोहतास चे पोलीस अधीक्षक राज यांनी म्हटले आहे की 11 वर्षानंतर शकुंतला झारखंडमध्ये आढळली जिथे तिने दुसरे लग्न केले होते त्यांनी असेही सांगितले की गढवा जिल्ह्यामध्ये एका पुरुषाबरोबर ते दिसून आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आणि सदर महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना चुकीची माहिती दिल्याबद्दल आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपांमध्ये शकुंतला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg