loader
Breaking News
Breaking News
Foto

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगार सज्ज

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगार सज्ज झाले आहे. लांजा आगाराकडून मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत एकूण १५६ जादा गाड्या सुटणार असून सर्वाधिक १०३ जादा गाड्या रविवार २० सप्टेंबर रोजी सुटणार आहेत. गणेशोत्सवासाठी दरवर्षी लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर दाखल होतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जादा गाड्या, मोफत बससेवा व रेल्वेने मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगाराकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लांजा आगाराने सुयोग्य नियोजन केले आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त परतीच्या प्रवासाला लागतात, त्यामुळे आज विसर्जनानंतर लांजा आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. बोरीवली, नालासोपारा, ठाणे, मुंबई, कल्याण, परळ, विरार, डोंबिवली व भांडूप या मार्गावर लांजा आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, शनिवार १९ सप्टेंबर रोजी ५, रविवारी २० रोजी सर्वाधिक म्हणजे १०३ तसेच २१ रोजी ४३ आणि २२ रोजी ५ अशा १५६ जादा गाड्यांचे आरक्षण झालेले आहे. दुपारनंतर या सर्व गाड्या सोडण्यात येणार असून यासाठी लांजा आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले असून अधिकारी व कर्मचारी वर्ग यासाठी विशेष परिश्रम घेत असल्याचे लांजा आगाराचे वाहतूक निरीक्षक ललित आयरे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg