loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोतळुक बाधवटेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. गुहागर तालुक्यातील कोतळुक बाधवटेवाडी येथील मुंबईत राहणारे आणि गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पक्षप्रवेशाला गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर, नवनीत ठाकूर, सुनील वाघे, प्रदीप कावनकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, तसेच शिवसेना नेते राजेश बेंडल प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थितीत कोतळुक भादवटे वाडीतील सर्व मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून भागात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवूनच हा प्रवेश केल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे गुहागर तालुक्यात शिवसेनेची ताकद कमालीची वाढली असून, विरोधकांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

टाईम्स स्पेशल

या पक्षप्रवेशामध्ये मुंबई कमिटी मार्गदर्शक विजय सिताराम बाधवटे, अध्यक्ष अनिल कावणकर, उपाध्यक्ष विजय कावणकर, सेक्रेटरी तुषार कावनकर, उप सेक्रेटरी युवराज कावणकर, गणेश कावडकर, वैभव बाधवटे, वसंत बाधवटे, अनंत कावणकर, मधुकर बाधवटे, संदेश बाधवटे, तसेच ग्रामीण कमिटी अध्यक्ष आसावरी बाधवटे, वैशाली बाधवडे, सुप्रिया बादवडे, सोनाली बाधवटे, जानवी कावनकर, संजीवनी बाधवटे, सानिका कावनकर, मानसी कावनकर यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg