loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे-कासारवाडीत गणेशोत्सवात अवतरली पंढरीची वारी

संगमेश्वर (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्त सावर्डे- कासारवाडी येथील रहिवासी सचिन पोकळे यांच्या घरी यंदा ‘आळंदी ते पंढरपूर पायी वारी’चा आकर्षक व जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. गणरायाच्या साक्षीने साकारलेल्या या भक्तिमय देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा या देखाव्यातून कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली आहे. फुलांनी सजवलेली श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, पादुका, भगवे ध्वज घेऊन जाणारे वारकरी, टाळ -मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-माऊली तुकाराम’च्या जयघोषाचे वातावरण यामुळे प्रत्यक्ष वारीचा अनुभव येथे मिळत आहे.वारीतील वैशिष्ट्‌यपूर्ण रिंगण सोहळा, अश्व तसेच वारीच्या मार्गावरील विविध महत्त्वाची ठिकाणेही देखाव्यात कल्पकतेने दाखवण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, कला आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणारा हा देखावा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg