loader
Breaking News
Breaking News
Foto

चौक परिसरातील दिड दिवसांच्या गणरायाला जड अंतःकरणाने निरोप

चौक, (अर्जुन कदम) सोमवारी गणेशचतुर्थी च्या शुभमुहुर्तावर आलेल्या दिड दिवसांच्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाची स्थापना करून दीड दिवसात विसर्जन करण्यामागे मुख्यत्वे शास्त्रोक्त तिथीची मर्यादा, भौगोलिक परिस्थिती आणि कृषी संस्कृतीची परंपरा ही प्रमुख कारणे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महर्षी व्यास आणि गणपतीची पौराणिक कथा किंवा चातुव्रताच्या नियमांनुसार दीड दिवसांच्या गणपतीची परंपरा आजही पाळली जाते. नोकरी-व्यवसायामुळे किंवा वेळेच्या उपलब्धतेमुळे अनेक कुटुंब, विशेषतः चाकरमानी वर्गातील लोक दीड दिवसांच्या बाप्पाची स्थापना करतात. आज खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील 488 व एक सार्वजनिक गणपती यांना साश्रू नयनांनि निरोप देण्यात आला.बाप्पाकडे चुकांबद्दल क्षमायाचना मागून "पुढच्या वर्षी लवकर या" अशी प्रार्थना करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.हद्दीतील ग्राम पंचायत यांनी निर्माल्य कलश ठेवले होते. गणेश घाट यांचीही साफसफाई केली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg