केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी दमदार कामगिरी करत आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे लांजा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती, राजापूर संचलित राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना तसेच तायक्वाँदो अकॅडमी, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे १० व ११ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत लांजा तालुक्यातून एकूण ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यापैकी दिपराज खानविलकर हा न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, लांजा येथे इयत्ता ११वीमध्ये शिक्षण घेत असून, तीर्था यादव ही डी. जे. सामंत स्कूल, लांजा येथे शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणासोबतच तायक्वाँदोच्या सरावासाठी सातत्याने मेहनत घेत या दोन्ही खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांची दिनांक १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर विभागात होणार्या शालेय तायक्वाँदो विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता विभागीय स्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या दोन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना मिळणार आहे.
या यशाबद्दल तायक्वाँदो फिटनेस अकॅडमी, लांजा, गुरुकुल तायक्वाँदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी, लांजा तसेच रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दीपराज खानविलकर व तीर्था यादव यांचे अभिनंदन करण्यात आले. अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सचिव व राष्ट्रीय पंच तथा प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे व सदस्य लक्ष्मण करारा यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.