loader
Breaking News
Breaking News
Foto

माखजन पंचक्रोशीत लाडक्या गणरायाला सवाद्य निरोप

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गेले सहा दिवस भक्ती रसात न्हाऊन गेलेल्या संगमेश्वर तालुक्यात माखजन आरवली पंचक्रोशीतील भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला व गौराईला सवाद्य निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आरोळ्या देत भाविकांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. पाऊस नसल्यामुळे विसर्जन मिरवणुकीला भाविकांना मनमुराद नाचता आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फटाक्यांची आतशबाजी, ढोल, ताशे, सनई, झांज आदींच्या गजरात मिरवणुका निघालेल्या पाहायला मिळाल्या. गुलालाची उधळण यामुळे सगळे, गुलाबी रंगात न्हाऊन गेले होते. अनेक ठिकाणी मिरवणुकीत गाण्यांच्या तालावर देखील भाविकांनी फेर धरला. मिरवणुकी दरम्यान फुगड्या घातल्या. मिरवणुकीमध्ये हातात किंवा डोक्यावर बाप्पाची मूर्ती न घेता, अलीकडे गाडीतून मूर्ती नेण्याकडे कल वाढू लागला आहे. वाडी वाडीच्या एकत्रित मिरवणुका निघाल्या होत्या.

टाईम्स स्पेशल

गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने विहिरी, तलाव, ओढे यांची पाण्याची पातळी लक्षणीय खाली गेल्याने विसर्जनावेळी पोहण्याचा मनमुराद आनंद लुटण्यात अडचणी आल्या. विसर्जनापूर्वी सामुहीक आरत्या झाल्या. प्रसाद वाटप झाले. त्यानंतर जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg