साटेली भर्दशी (प्रतिनिधी) - गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद - २०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या व्यासपीठाचा उपयोग शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी, नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी करण्यात आला.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना नागरिकांना येणार्या अडचणी, त्यांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवांची माहिती नागरिकांना देण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘इरिरि.ेअॅस’ पोर्टलची माहिती देण्यात आली. तसेच महसूल विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा व सुविधांची माहितीही देण्यात आली. गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा प्रभावीपणे जनजागृतीसाठी उपयोग करत शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल साटेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी साटेलीच्या सरपंच छाया धर्णे, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश धर्णे, शामसुंदर धर्णे, लक्ष्मण मयेकर, पंकज गाड, दत्ताराम धर्णे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध विभागांच्या अधिकार्यांच्या सहभागातून नागरिकांना शासनाच्या योजना, सेवा, सुविधा आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांचे प्रश्न, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.