loader
Breaking News
Breaking News
Foto

उंच टेकडीवरुन समुद्राच्या पाण्यात पडल्याने हर्णे येथे खवले मांजराचा मृत्यू

दापोली (प्रतिनिधी) : हर्णे येथे खवले मांजर मृतावस्थेत आढळून आले. या संदर्भात येथील एका जागृत नागरिकांने वन विभागाला कळविले. खवले मांजर आढळून आल्याची माहिती मिळताच वन विभाग अधिकारी प्रभू सबाणे यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील सोपस्कार पूर्ण केले. दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्रकिनारी एक वन्यप्राणी खवले मांजर हे समुद्रकिनारी मृत अवस्थेत पडले असल्याबाबत हर्णे गावचे ग्रामस्थ फहाज जमादार यांनी दापोली वन विभागाला कळविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली. सदर मृत अवस्थेत असलेले खवले मांजर ताब्यात घेऊन पाहिले असता त्याचे पूर्ण शरीराचे अवयव सुस्थितीत असल्याची त्यांची खात्री झाली मात्र सदरचे खवल्या मांजर हे उंच टेकडीवरून समुद्राच्या पाण्यामध्ये पडल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. सदर खवले मांजराला वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार त्यांनी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg