loader
Breaking News
Breaking News
Foto

६० हजारांची लॅपटॉप बॅग अवघ्या १२ तासांत परत, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने गहाळ बॅगेचा शोध

खेड (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी पुण्याहून खेडला आलेल्या महिलेची ६० हजार रुपये किमतीची लॅपटॉप बॅग बस स्थानकावर गहाळ झाली होती. मात्र खेड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १२ तासांत ती बॅग संपूर्ण मुद्देमालासह परत मिळाली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मूळ शेल्डी येथील रहिवासी असलेल्या आदिती विनोद आंब्रे या शुक्रवारी (ता. ११) पहाटे पुणे-खेड एसटी बसने खेडला आल्या होत्या. सकाळी सुमारे ५ वाजता बस स्थानकावर उतरल्यानंतर त्यांची लॅपटॉप आणि इतर साहित्य असलेली बॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांच्या नेतृत्वातील पथकाने तातडीने तपास सुरू केला. बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बॅगचा शोध घेतला आणि अवघ्या १२ तासांत लॅपटॉपसह संपूर्ण मुद्देमाल सुरक्षितपणे आदिती आंब्रे यांच्या ताब्यात दिला. गणेशोत्सवाच्या तोंडावर बॅग हरवल्याने हवालदिल झालेल्या आंब्रे कुटुंबियांनी खेड पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg