loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंद्रावळे डाफळेवाडीचा पाणीप्रश्न सुटला; नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते नळपाणी योजनेचे लोकार्पण

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील चिंद्रावळे डाफळेवाडी येथील नळपाणी योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या योजनेमुळे डाफळेवाडीतील ग्रामस्थांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर महत्त्वाचा तोडगा निघाला आहे. नळपाणी योजना कार्यान्वित झाल्याने डाफळेवाडीतील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांना पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार आहे. त्यामुळे योजनेच्या उद्घाटनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत या कामाचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीतशेठ ठाकूर, सरपंच तेजस्वी कांबळे, माजी सभापती दत्तरामजी निकम, विनायक कांबळे, संदीप डाफळे, गंगाराम डाफळे यांच्यासह डाफळेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नेत्रा ठाकूर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. तसेच डाफळेवाडी परिसरातील इतर मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

टाईम्स स्पेशल

गावागावांतील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असून, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव आणि वाडीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाणी ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असून, डाफळेवाडीतील नळपाणी योजनेचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नळाला आलेले पाणी पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत योजनेच्या पूर्ततेबद्दल आनंद व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg