loader
Breaking News
Breaking News
Foto

विकासकामातून उमरटवाडीचा रस्ता झाला सुकर; ग्रामस्थांनी मानले आमदार शेखर निकम यांचे आभार

संगमेश्वर - कळंबस्थे उमरटवाडी येथे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उमरटवाडी विकास मंडळाच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. उमरटवाडीतील एसटी स्टॉप ते काळकाई देवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला. या विकासकामामुळे नागरिकांची अनेक दिवसांपासूनची रस्त्याची समस्या दूर झाली असून, दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उमरटवाडी विकास मंडळाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार शेखर निकम यांचे स्वागत केले. तसेच रस्त्याच्या विकासकामासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विकास हा कागदावर न राहता गावागावांत प्रत्यक्ष दिसला पाहिजे. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम म्हणाले, गावातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांना प्राधान्य देऊन विकासकामे मार्गी लावण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो. उमरटवाडीतील या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी झाली, याचे समाधान आहे. पुढेही गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया.

टाईम्स स्पेशल

आमदारांच्या या मनोगतातून ‘लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि विकासकामांना गती’ ही त्यांची भूमिका अधोरेखित झाली. यावेळी वाडीप्रमुख चंद्रकांत नेमण, गोपाळ नेमण, ग्रामपंचायत सदस्य पार्वती गोवळकर, अध्यक्ष सुभाष नेमण, उपाध्यक्ष प्रकाश निवळकर, सचिव राजेंद्र नेमण, उपसचिव सुहास खांडेकर, खजिनदार चेतन गोवळकर, उपखजिनदार विश्वनाथ बोरसुतकर, कार्याध्यक्ष अशोक सनगरे, उपकार्याध्यक्ष सुधीर मुंडेकर तसेच मंडळाचे सर्व सल्लागार, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकर्‍यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेमुळे उमरटवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg