loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगे येथील जानकी जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : घोटगे-भीमानगर येथील ज्येष्ठ महिला जानकी लक्ष्मण जाधव यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने घोटगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कै. जानकी जाधव या माजी पोलीस पाटील शंकर लक्ष्मण जाधव यांच्या मातोश्री होत. प्रेमळ, कुटुंबवत्सल स्वभावाच्या जानकी जाधव यांनी आपल्या कुटुंबाला संस्कारांची शिदोरी देत कुटुंबाचा आधारवड म्हणून आयुष्य व्यतीत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, आप्तेष्ट व ग्रामस्थांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या. कै. जानकी लक्ष्मण जाधव यांच्या पश्चात एक मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधार गमावला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg