loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीसह जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी ( जमीर खलफे ) : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणी करत आज रत्नागिरी जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी बाप्पाची मिरवणूक काढण्यात येत आहे. गेले पाच दिवस जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आणि आज लाडक्या बाप्पाला आणि गौराईला भाविकांकडून जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ सार्वजनिक, एक लाख २४ हजार ९७७ घरगुती गणेशमूर्ती तर ४३ हजार ३७ गौरींचे विसर्जन करण्यात येत आहे.. कोकणात गेले पाच दिवस गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने घरोघरी आनंदमय, चैतन्यमयी वातावरण होते. पाच दिवसांचा सण साजरा करून आता बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.. विसर्जन शांततेत व्हावे, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg