loader
Breaking News
Breaking News
Foto

जयगड-मुंबई गाडीच्या कंडक्टरचा प्रामाणिकपणा, प्रवासी महिलेची पर्स दिली परत

रत्नागिरी - सायंकाळी, जयगड -मुंबई गाडीने प्रवास करण्यासाठी, वाटद मिरवणे येथिल पात्ये ताई काल शनिवार दिनांक 19/09/2026 रोजी गाडीत बसण्यासाठी जात होत्या. तेव्हा त्यांची पर्स खंडाळा बस स्थानकासमोर रस्त्यावर पडली, दरम्यान आज रविवार दिनांक 20/09/2026 रोजी सकाळी उंडी - रत्नागिरी ही गाडी घेऊन आलेले कंडक्टर सचिन पांचाळ टेंबे, यांना बस स्थानकासमोर पडलेली एक पर्स दिसली, त्या पर्समध्ये एटीएम कार्ड व पैसे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी ज्यांची पर्स पडली होती त्यांना फोनवरून संपर्क केला व त्यांचीच पर्स आहे का? याची खात्री करून घेतली व नंतर ती पर्स खंडाळा कंट्रोल ऑफिसचे कंट्रोलर कांबळे यांच्याकडे सुर्पद केली व ती पर्स पात्ये ताईचे नातेवाईक यांना देण्यात आली. या प्रामाणिकपणाबद्दल खंडाळा परिसरात कंडक्टर सचिन पांचाळ यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाचरे, शशिकांत साळस्कर, लक्ष्मण वाळके, शेखर भडसावळे, परेश गुरव, अजय मोघे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg