मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा निर्माण केली असतानाच, दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी वकिलांसह मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे यांच्यासाठी मानहानीची नोटीस देण्याची भूमिका घेतली. अखेरीस ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली; मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे मातोश्रीबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आता एक मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहे,नोटीस देण्यासाठी कायदेशीर आणि अधिकृत मार्ग उपलब्ध असताना मातोश्रीवर प्रत्यक्ष जाण्याचा आग्रह नेमका कशासाठी? कायदेशीर नोटीस पोस्टाने, रजिस्टर एडीसारख्या माध्यमातून किंवा संबंधित कायदेशीर प्रक्रियेतून पाठवता येत असताना थेट एखाद्या राजकीय नेत्याच्या निवासस्थानी जाण्याची गरज का निर्माण झाली? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
विशेषतः हे प्रकरण आधीच अत्यंत संवेदनशील असून त्याला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत एखाद्या निवासस्थानाबाहेर प्रत्यक्ष गर्दी होईल, कार्यकर्ते जमा होतील आणि वातावरण तापेल, याची शक्यता लक्षात घेणे आवश्यक नव्हते का? न्यायालयीन आणि तपास यंत्रणांची प्रक्रिया सुरू असताना रस्त्यावर किंवा निवासस्थानाबाहेर निर्माण होणारा संघर्ष कोणाच्या हिताचा आहे? दिशा सालियन यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी स्वतःचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगितले असून प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी भूमिका मांडली आहे.
मग प्रश्न एवढाचन्यायालय आणि तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याऐवजी मातोश्रीवर प्रत्यक्ष जाऊन नोटीस देण्याची पद्धत निवडल्याने नेमका कोणता संदेश महाराष्ट्रासमोर जातो? शिवसैनिकांच्या भावना आधीच या प्रकरणामुळे तीव्र आहेत. त्यामुळे अशा प्रत्यक्ष भेटींमुळे अनावश्यक गैरसमज, तणाव आणि राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढत नाही का? आज महाराष्ट्राला आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य, पुरावे आणि कायदेशीर तपासाची गरज आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना प्रत्येकाने संयम राखणे आणि कायद्याच्या चौकटीतच आपली बाजू मांडणे, हेच लोकशाहीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे नाही का? वाद निर्माण करण्यापेक्षा सत्य समोर येऊ द्या; राजकीय संघर्षापेक्षा तपासाला बोलू द्या!, असे त्यांनी सांगितले.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.