loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना पितृशोक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांचे वडील तथा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावचे रहिवाशी व निवृत्त माध्यमिक शिक्षक वसंत दगडू कुंभार यांचे 10 सप्टेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षाचे होते. वसंत दगडू कुभांर एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मांगरूळ गावच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. सर्वाशी ते सौहार्दपूर्ण वागत असत गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांनी अभिजीत कुंभार यांच्या मांगरूळ येथील निवासस्थानी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुन, जावई असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg