loader
Breaking News
Breaking News
Foto

घोषणा देणे, कविता ऐकवणे, आंदोलनात सहभाग, पुस्तकाचे शीर्षक..., सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्वल भुयान यांचेकडून तुच्छ अपराधिक प्रकरणाबाबत चिंता व्यक्त

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्वल भुयान यांनी तुच्छ अपराधिक प्रकरणाबाबत भारताची न्यायव्यवस्था उदार लोकतांत्रिक जगासमोर उपहासाचे चित्र उभे करीत आहे,असे म्हटले आहे . निम्न न्यायालयाने अशा प्रकरणांना संपुष्टात आणण्यासाठी विशेष अभियान चालविले पाहिजे, असे म्हटले आहे.बार अँड बेंच रिपोर्ट नुसार जस्टीस उज्वल भुयान यांनी म्हटले आहे की," फक्त जेवण जेवल्याने, कविता ऐकविल्याने, आंदोलनात सहभाग घेतल्याने, घोषणा दिल्याने, सोशल मीडियावर टीका केल्याने आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन च्या रूपात प्रस्तुती सादर केल्याने अशा अनेक प्रकरणात अपराधिक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.याशिवाय पुस्तके आणि चित्रपटाचे शीर्षक तथा त्यातील सामग्री आदी अन्य तुच्छ आधारावर प्रकरणे दाखल केली जात आहेत."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी म्हटले आहे की हे आरोप हास्यास्पद आहेत आणि ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करणारे ठरू शकतात त्याशिवाय अशा बाबींमध्ये अपराधिक गुन्हे दाखल करून न्यायालयीन कारवाई सुरू केली जाते. जस्टीस भुयान यांनी यासंदर्भात आकड्यांवर विशेष जोर दिला. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रेड अनुसार 17 सप्टेंबर पर्यंत सर्व न्यायालयात 4.27 करोड अपराधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये 4.07 करोड म्हणजे 95.31% प्रकरणे खालील न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच 19.84 लाख म्हणजे 4.64% प्रकरणे उच्च न्यायालयांमध्ये आणि 22,143 प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत.न्यायमूर्ती म्हणाले की "जेव्हा न्यायालय मध्ये इतकी प्रकरणी प्रलंबित आहेत आणि व्यवस्था त्याबाबत असमर्थ आहे म्हणजे स्थिती बरोबर नाही, अशावेळी तुच्छ प्रकरणांना यामध्ये जोडून खालील न्यायालयांना असहनीय ओझे वाढविण्यासारखे आहे."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg