रत्नागिरी (जमीर खलफे) - जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच बुधवारी दुपारनंतर आलेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. ढगांच्या प्रचंड गडगडाटासह अचानक दाखल झालेल्या या मुसळधार पावसाने ऐन सणाच्या धामधुमीत नागरिक, आणि व्यापाऱ्यांची मोठी दाणादाण उडवली. अवघ्या तासभराच्या पावसाने रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेचे मोठे नुकसान केले असून, सणाच्या तोंडावर व्यापारी चिंतेच्या सावटाखाली सापडला आहे. मंगळवारीच लाडक्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला असून, आता सर्वत्र महालक्ष्मी अर्थात गौरीच्या आगमनाची उत्सुकता आहे.
गौरी गणपतीच्या सणासाठी रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे सजली होती. पूजासाहित्य, सजावटीचे सामान आणि लागणाऱ्या वस्तू व्यापाऱ्यांनी दुकानांबाहेर व रस्त्यावर आकर्षकपणे मांडल्या होत्या. खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत असतानाच, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि काही सेकंदांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसाने व्यापाऱ्यांना आपले सामान हलवण्याची संधीही दिली नाही. उघड्यावर मांडलेले लाखो रुपयांचे सामान पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही पळापळ झाली, ज्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाई आणि संकटांचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना हा परतीचा पाऊस आणखी किती फटका देणार, या विचाराने चिंता वाढवली आहे. ऐन सणाच्या काळात पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे सणाच्या उत्साहावर विरझण पडले आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.