loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी केंद्रशाळेत रानभाजी विक्री उपक्रम

साटेली भेडशी : साटेली भेडशी केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी रानभाजी विक्रीचा उपक्रम उत्साहात राबवला. परिसरातील विविध रानभाज्या विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी मांडल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख, त्यांचे महत्त्व तसेच प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला. शालेय ज्ञानाची जोड प्रत्यक्ष व्यवहाराशी घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः रानभाज्यांची मांडणी, विक्री आणि व्यवहार करताना प्रत्यक्ष अनुभव घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला जि. प. सदस्य श्वेता धर्णे, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत धर्णे, माजी सभापती प्रज्ञा नाईक, केंद्रप्रमुख दत्ताराम दळवी, ग्रामपंचायत सदस्य सावंत यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञान मिळावे आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम शालेय शिक्षणाची नवी दिशा दाखवणारा ठरला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg