loader
Breaking News
Breaking News
Foto

अपघातातील मृताच्या वारसांना 75 लाखांची नुकसान भरपाई - खेड न्यायालयाचा आदेश

खेड (दिलीप देवळेकर ) : अपघातात मृत्यू झालेल्या शुभम काणेकर यांच्या वारसांना 75 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.याबाबत हकीकत अशी की, दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शुभम काणेकर याचा पल्सर दुचाकीवरून जात असताना अपघाती मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांतर्फे खेड येथील प्रसिद्ध वकील ॲड. सुधीर बुटाला व ॲड. समीर शरद शेठ यांनी जिल्हा न्यायालय, खेड येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.या खटल्याची नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन मेहरबान न्यायालयाने एकूण 75 लाख रुपये (मुद्दल 66 लाख + दाखल तारखेपासून 8% दराने व्याज) देण्याचे आदेश विमा कंपनी / प्रतिवादींना मोटार वाहन अपघात न्यायमूर्ती चांदुगुडे साहेब यांनी दिले आहेत.या निकालामुळे मृताच्या वारसांना न्याय मिळाल्याबद्दल ॲड. बुटाला व ॲड. शेठ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg