loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाचा माहोल असताना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे १७व्या दिवशीही बेमुदत साखळी उपोषण, कामगारांचा जोरदार पाठिंबा!

मुंबई : सभोवार सार्वजनिक गणेशोत्सवाचा माहोल चालू असला तरी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित आज १७ व्या दिवशी बेमुदत साखळी उपोषणात उग्र निदर्शने करून कामगारांनी आपल्या मागण्यांना जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. कामगारनेते महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपनेते सचिन अहिर यांनी गेल्याच महिन्यात दिल्लीमध्ये मान्यवर केंद्रीय मंत्र्यांची खासदारांच्या शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन, एन. टी. सी.गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच आश्वासनाचीपूर्ती केंद्र सरकारने करावी, याचसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने, बंद टाटा, इंदू मिल क्रमांक ५, पोद्दार, दिग्विजय या चार एनटीसीच्या गिरण्यांवर सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून ही साखळी उपोषणे आयोजित करण्यात आली आहेत. या गिरण्या पूर्ववत चालवून कामगारांच्या हाताला काम देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात संबंधित संघटन सेक्रेटरी, प्रतिनिधी, कार्यकर्ते विशेषतः महिला कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

टाईम्स स्पेशल

हा प्रश्न राज्य सरकारने केंद्राशी मध्यस्थीने सोडवावा, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे. कामगारांना मागील ११ महिन्याचा पगार देण्यात यावा, मागील वर्षाची ग्रॅज्युटी कामगारांना मिळाली पाहिजे, निवासभाडे, प्रवासभत्ता इत्यादी कायदेशीर देणी कामगारांना मिळाली पाहिजेत, अशा घोषणा कामगारांनी आंदोलनात केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg