loader
Breaking News
Breaking News
Foto

मोबाईलच्या आभासी दुनियेत मळगाव तेलकाटावाडी येथील छोट्या मुलींनी मात्र संस्कृतीची नाळ घट्ट धरलीय

सावंतवाडी : मोबाईलच्या आभासी दुनियेत रमणाऱ्या आजच्या पिढीतील मुलांना पारंपरिक कला आणि संस्कृतीचा विसर पडत चालला असताना, मळगाव तेलकाटावाडी येथील छोट्या मुलींनी मात्र आपल्या संस्कृतीची नाळ घट्ट धरून ठेवली आहे. फुगडी या महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे जतन करण्यासाठी या मुलींनी एकत्र येत माता जिजाऊ कुमारी फुगडी मंडळाची स्थापना करत पारंपरिक फुगडीच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या चिमुकल्यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या डिजिटल युगात लहान मुले मोबाईल, दूरचित्रवाणी आणि विविध मनोरंजनाच्या साधनांमध्ये अधिक रमलेली दिसतात. अशा परिस्थितीत मळगाव तेलकाटावाडी येथील मुलींनी मोबाईलच्या आभासी जगापेक्षा आपल्या मातीत रुजलेल्या पारंपरिक कलांना प्राधान्य दिले आहे. फुगडीच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. तेलकाटावाडी येथील या चिमुकल्या मुलींनी एकत्र येत ‘माता जिजाऊ कुमारी फुगडी मंडळाची स्थापना केली. यंदा या मंडळाचे दुसरे वर्ष असून, मंडळाच्या माध्यमातून विविध पारंपरिक फुगड्यांचे सादरीकरण केले जात आहे. फुगडीच्या तालावर फेर धरताना या मुली केवळ कला सादर करत नाहीत, तर आपल्या लोकपरंपरेचा समृद्ध वारसाही जपत आहेत.फुगडी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी घट्ट जोडलेली पारंपरिक कला आहे. सण-उत्सव, विशेषतः गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात फुगडीला विशेष महत्त्व असते. या कलेच्या माध्यमातून महिलांमध्ये आणि मुलींमध्ये एकोपा, आनंद आणि सांस्कृतिक जिव्हाळा निर्माण होतो. तेलकाटावाडी येथील या चिमुकल्या मुली फुगडीच्या माध्यमातून हीच परंपरा पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg