loader
Breaking News
Breaking News
Foto

गृहराज्यमंत्र्यांच्या सहकार्याने खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघातील गणेशभक्तांसाठी खेड-दिवा MEMU स्पेशल मोफत

खेड (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदार संघातील गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने यंदाही खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशलमधून परतीचा मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल 20 व 21 सप्टेंबर रोजी चालवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी दुपारी 3 वाजता खेड रेल्वे स्थानकात मोफत पासचे वाटप करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही स्पेशल ट्रेन सायंकाळी 4 वाजता खेड स्थानकातून सुटून रात्री 10 वाजता दिवा येथे पोहोचेल. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना व राष्ट्रीय कर्मचारी सेना अंगीकृत रिक्षा सेनेचे पदाधिकारी, शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. गणेशभक्तांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg