देवगड (प्रतिनिधी) - किर्लोस गावचे सुपुत्र तसेच अनेक पुरस्कार प्राप्त आणि घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे संचालक भाऊराव विष्णू घाडीगावकर यांचे दि १४ सप्टेंबर २६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने मुंबईत दुःखद निधन झाले. भाऊराव हे अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. सध्याच्या काळात कोणालाही न समजणार्या प्राचीन मोडी लिपीचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी हल्लीच मोडी लिपी मंथन हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशित केले आहे. अनेक मोडी लिपी अभ्यासकांमध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. भाऊराव लेखकच नाही तर उत्कृष्ट असे काव्य करण्यामध्ये सुद्धा तरबेज होते.
त्यांनी अनेकांच्या जीवनावर बोलता बोलता उत्कृष्ट अशी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या गावाकडील त्रिमूर्ती हायस्कूलवर ते एक मार्गदर्शक म्हणून काम करीत असत. मुंबईतील बेस्टमध्ये अधिकारी पदावरून पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेने निवृत्त झाले. सध्या ते ७५ वर्षे वयाचे होते. त्यांचा स्वभाव शांत व स्मितभाषी होता, त्यामुळे ते सर्वांना प्रिय होत, असे व्यक्तिमत्व आज समाजातून निघून गेल्यामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. पतपेढीच्या प्रत्येक कार्याचे हिरारीने सहभाग घेत असत. ते प्रामाणिक व मेहनती होते. पतसंस्थेसाठी ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करीत असत. राज्य शासनाने सहकार विभागासाठी दिलेल्या प्रशिक्षणासाठी सुद्धा ते वेळोवेळी हजर असत. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. त्यामुळे त्यांचे अनेक संस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांचे अक्षर हे मोत्याच्या दागिन्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने पतसंस्था एका महत्त्वाच्या मार्गदर्शकास मूकलेली आहे. आमच्या संस्थेचे संचालक, कर्मचारीवृंद आणि तमाम सभासद त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे आहेत. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वराने हे दुःख झेलण्याची चांगली ताकद द्यावी आणि त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो, अशी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. घाडीगावकर पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर शांताराम वायंगणकर, यांनी भावना व्यक्त केली आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.