खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी परिसरात हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. खवटी येथील एन.एच.-६६ महामार्गालगत असलेल्या सुरूर्ची हॉटेलमध्ये एका हॉटेल कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्राला हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी अभय गौतम धोत्रे (वय ३२, रा. नातूनगर वावे फाटा, बौद्धवाडी) हे त्यांचा मित्र योगेश विट्ले यांच्यासोबत १४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास खवटी येथील शेठ चायनीज सेंटरसमोर गाडीवर बसले होते. त्यावेळी आरोपी अमोल दळवी (रा. पाखरवाडी, खवटी) हा बोलेरो वाहन क्रमांक ए.पी. ०९ पी ८५ घेऊन तेथून जात होता.दरम्यान, दळवी यांच्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश फिर्यादी अभय धोत्रे यांच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे धोत्रे यांनी याबाबत वाहनचालक अमोल दळवी याला विचारणा केली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या विचारणाचा राग मनात धरून अमोल दळवी याने त्याच्यासोबत असलेल्या सहा ते सात अनोळखी इसमांना सोबत घेत फिर्यादीशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा वाद वाढल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पायाला खटका मारून त्यांना खाली पाडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुरूर्ची हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हॉटेलच्या आतील भागापर्यंत फिर्यादी अभय धोत्रे तसेच त्यांचा मित्र योगेश विट्ले यांना हाताने मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता प्लास्टिकच्या खुर्चीचा वापर करूनही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या मारहाणीमध्ये अभय धोत्रे आणि त्यांचा मित्र योगेश विट्ले हे दोघेही जखमी झाले आहेत. मारहाणीदरम्यान आरोपींनी शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.याप्रकरणी अभय गौतम धोत्रे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ३.१९ वाजता मु.गु.नं. ३०८/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणातील इतर आरोपींची ओळख आणि घटनेतील नेमकी भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.ही घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री ८.४० वाजता खवटी येथील सुरूर्ची हॉटेलमध्ये घडली असून, त्यानंतर काही तासांतच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.