loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियान अंतर्गत शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात

रत्नागिरी (जमीर खलफे) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी यांच्या वतीने दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्के प्रशाला येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विशेषत: इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, अवयवदानाचे सामाजिक व मानवतावादी महत्त्व समजावून सांगणे तसेच अवयवदाना संदर्भातील गैरसमज दूर करणे हा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमा दरम्यान अवयवदानाची संकल्पना, त्याचे सामाजिक महत्त्व आणि गरजू रुग्णांसाठी त्याची उपयुक्तता याविषयी रेशम जाधव ( समाजसेवा अधिक्षक - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रत्नागिरी) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अवयवदान केल्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन प्राप्त होऊ शकते, ही बाब विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातील इतर घटकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक के.डी.कांबळे तसेच उप मुख्याध्यापिका पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सुरळीतपणे पार पडले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थितांच्या सर्व प्रश्नांना समर्पक व सुलभ भाषेत उत्तरे देण्यात आली आणि अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजोपयोगी कार्याची भावना दृढ होण्यास मदत होते तसेच अवयवदानासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो असे रेशम जाधव यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg