loader
Breaking News
Breaking News
Foto

धाकोरेत साकारला मातीच्या घराचा राखणदार गणेश

​सावंतवाडी : सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक हालते देखावे, पर्यावरणपूरक सजावट तसेच सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर घरगुती गणपतीच्या सजावटीतून कोकणची संस्कृती, रूढी-परंपरा आणि जुन्या आठवणी जपण्याचा प्रयत्नही अनेक गणेशभक्तांकडून केला जात आहे. धाकोरे येथील मुळीक वाडीतील युवा कलाकार नितीन मुळीक यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या कलाकृतीतून अशीच आगळीवेगळी संकल्पना साकारली आहे. त्यांनी आपल्या घरातील गणरायाची सजावट करताना ‘मातीच्या घराचा राखणदार’ ही संकल्पना साकारली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सजावटीमध्ये पूर्वीच्या काळातील मातीच्या घराची हुबेहूब प्रतिकृती उभी करण्यात आली असून, त्यामध्ये विराजमान असलेला गणराया हा त्या घराचा राखणदार म्हणून दाखविण्यात आला आहे. गणेशमूर्तीला आधुनिक रंगांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण आरास मातीच्या माध्यमातून साकारून पारंपरिकतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ‘मातीच्या घरात केवळ भिंती नसतात, तर कोकणच्या आठवणी, संस्कृती आणि मायेचा सुगंध असतो,’ असा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे. घराचा, समाजाचा आणि आपल्या भूमीचा खरा राखणदार हा गणराया असून, माती, निसर्ग आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश नितीन मुळीक आणि त्यांच्या कुटुंबाने या संकल्पनेतून दिला आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे त्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा आदर्शही मांडला आहे. पूर्वीच्या काळातील मातीची घरे, त्यांची रचना आणि त्या वातावरणातील गणेशस्थापनेची आठवण या सजावटीतून जिवंत करण्यात आली आहे. पारंपरिक कोकणी जीवनशैली, मातीशी असलेले नाते आणि गणेशभक्ती यांचा सुंदर मिलाफ या सजावटीत पाहायला मिळत आहे. नितीन मुळीक यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि संदेशपर सजावटीचे परिसरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg