loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड रेस्ट हाऊसच्या निकृष्ट कामावर पालकमंत्री संतापले

रत्नागिरी : खेड येथील शासकीय रेस्ट हाऊसच्या कामाच्या दर्जावर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त करत हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. लाखो रुपये खर्च करून जर अशा पद्धतीने कामे होणार असतील, तर त्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. शासकीय इमारतींच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, कामाचा दर्जा समाधानकारक नसेल तर शासनाचा पैसा खर्च होऊनही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. खेड रेस्ट हाऊसच्या कामाबाबत पालकमंत्री सामंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे आता या कामाच्या गुणवत्तेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्र्यांच्या आरोपाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी खेड रेस्ट हाऊसच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाहणीदरम्यान कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष करण्यात आलेले बांधकाम याची तपासणी होणार आहे. पालकमंत्री सामंत यांचे आरोप आणि त्यानंतर अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडून होणारी प्रत्यक्ष पाहणी यामुळे या प्रकरणाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. पाहणीत नेमके काय आढळते, कामाच्या दर्जाबाबत कोणती भूमिका घेतली जाते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg