loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई - कोकणसह सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात आगमन... प्रचंड जल्लोषात निघाल्या भव्य मिरवणुका !

रत्नागिरी/ :" गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष... ढोल ताशांचा निनाद... फुलांनी सजवलेल्या माळा. आणि भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थीला रत्नागिरीसह कोंकणात सर्वत्र मोठ्या उत्साही वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले . गणेश भक्तांनी अगदी वाजत गाजत बाप्पाची मूर्ती घरी आणली.रत्नागिरी शहरातून गेली चाळीस वर्षे निघणारी कर्ला आंबेशेत गावाची भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत भजन ,दांडपट्टा , ढोल वाद्य यांनी गणेशोत्सव सोहळ्याला रंगत आणली. प्रचंड उत्साह संचारलेला दिसून आला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळपासूनच श्री गणेशाच्या आगमन मिरवणुका निघाल्या. गावागावात बालगोपाळांसह आबाल वृद्धांनी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणले. यंदा गणेशोत्सवात पारंपारिक वाद्य लेझीम आणि ढोल ताशे यावरच गणेश भक्तांनी भर दिलेला दिसून आला. गणेशोत्सवात सर्वत्र अतिशय सौहार्दाचे, आनंदाचे, प्रेमाचे व एकतेचे दर्शन झाले.

टाइम्स स्पेशल

आज मुंबई देखील गणेशोत्सव निमित्त बाप्पाच्या आगमनाच्या भव्य मिरवणुका निघाल्या. ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा पासून समुद्र किनारपट्टी पर्यंत लाखो गावांमधून आज घरोघरी बाप्पाच्या आगमन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg