loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्साही नवतरुण कला मंडळासह तांबडीवाडी ग्रामस्थ मंडळाचा ‘एक दिवस गावासाठी’चा स्तुत्य उपक्रम

मंडणगड (प्रतिनिधी) : तांबडीवाडी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री गणेश मंदिरासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करत एक अत्यंत पवित्र आणि कौतुकास्पद काम करत आपल्या प्रत्यक्षपणाच्या मेहनतीचा मंदिर बांधकामासाठी हातभार लावला आहे. मंडणगड तालुक्यातील तांबडीवाडी येथे नव्याने श्री गणपती मंदिर बांधण्यात येत आहे वाडीची लोकसंख्या आणि कुटुंब संख्या कमी असतानाही ग्रामस्थांच्या एकीच्या बळावर श्री गणपतीचे मंदिर उभारण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बहुतांश बांधकाम पूर्ण होत आले आहे. बांधकामासाठी लागणारे दगड, जांभा चिरे, वाळू आदी सामान उचलून नीट ठेवणे आजुबाजुच्या परिसरातील स्वच्छता आदी मेहनतीच्या कामासाठी उत्साही नवतरुण कला मंडळ आणि तांबडीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या सदस्यांचे हात राबले. गणेशोत्सव काळात मुंबईकर चाकरमानी हे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी आले आहेत त्यातील उत्साही नवतरुण कला मंडळ तांबडीवाडी आणि तांबडीवाडी ग्रामस्थ मंडळाने श्री गणपती मंदिर परीसर स्वच्छता आणि श्रमदान ‘एक दिवस गावासाठी’ हा गावाच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबवलेला एक लोकसहभागाचा महत्त्वाचा उपक्रम ठरला.

टाईम्स स्पेशल

गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यस्त वेळेतून एक दिवस गावातील कामांसाठी देते. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थ स्वतः गावाची कामे करतात. या मोहिमेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मिळून काम करतात. अशा या उपक्रमाने केल्या जाणार्‍या कामांमध्ये आपलेपणा आणि संघभावना अधिक घट्ट होते. अशाच प्रकारचे काम तांबडीवाडी येथील मुंबईकर आणि स्थानिकांनी एकत्रितपणे करत आपलेपणा जपण्याचे महत्वाचे काम केले आहे. या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg