loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे नदी पाञात पाणी पिण्यासाठी गेलेल्या गायीवर मगरीचा हल्ला, जीवावर आलेले शेपटीवर निभावले

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कळणे येथील नदी पाञात पाणी पिण्यासाठी गेलेल्या पाळीव गायीवर नदी पाञात दबा धरून बसलेल्या भल्या मोठया मगरीने अचानक हल्ला चढवला. यावेळी गुरासोबत असलेल्या इसमाने जोरदार आवाज केला. यावेळी गायीच्या जीवावर आलेले संकट शेपटीवर निभावले, तरी मगर तोंड उघडून पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी तोंड उघडलेल्या अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो काढला. सदर गाय ही जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांचे पती अजित पडवळ यांची आहे. या हल्ल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेनंतर वन विभाग दोडामार्ग यांनी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. कळणे गावात अजित पडवळ यांची शेती बागायती आहे. पाळीव गायी आहेत. या ठिकाणी बागायती देखभाल तसेच गुरे चारण्यासाठी एक कामगार ठेवला आहे. त्याने नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी गुरे चारण्यासाठी सोडली, दुपारी साडेबारा वाजता गुरे पाणी पिण्यासाठी नदी पाञात गेली असता कळणे नदी पाञात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक गायीवर हल्ला चढवला.

टाईम्स स्पेशल

यावेळी गायीने पटकन पाठ फिरवली व पळण्याचा प्रयत्न करताना तिची शेपटी मगरीच्या जबड्यात सापडून तुटली. जीवावर आलेले संकट शेवटी शेपटीवर निभावले. दरम्यान या घटनेची माहिती सरपंच अजित देसाई यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. या नंतर वन विभाग दोडामार्ग यांना माहिती दिली. भल्या मोठया मगरीचा वावर धोकादायक झाला आहे. तेव्हा मगरीचा उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी कळणे सरपंच अजित देसाई यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg