loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. शिवराम सांडये यांच्या स्मरणार्थ मुलगा अरविंद सांडये यांच्यातर्फे नेमळे शिक्षण संस्थेस ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी ठेव सुपूर्द

सावंतवाडी (प्रतिनिधी) - नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य व सेक्रेटरी कै.शिवराम आत्माराम सांडये यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा अरविंद शिवराम सांडये रा. नेमळे सध्या नोकरीनिमित्त रत्नागिरी येथे राहत असून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेकडे कायम स्वरूपी पन्नास हजार रुपये ठेव नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे सचिव पांडुरंग दळवी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठेवीतून दरवर्षी दहावीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व बारावीतील आर्ट्स आणि कॉमर्समधून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना या ठेवीतून कायम स्वरूपी बक्षीस जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले हे योगदान निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. या उदात्त देणगीबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आर.के.राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अरविंद सांडये यांचे मनःपूर्वक आभार व कृतज्ञता व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg