वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील कीर्तनवाडी रोड (वरचा विभाग) येथे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून विद्युत पोल उभे असतानाही त्यावर दिवे बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, परिसरातील सर्व पोलवर लाईट लावण्यात आली आहे.
मनसे नेते प्रमोद गांधी, जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर तसेच उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर यांनी या प्रश्नाकडे वैयक्तिक लक्ष घालत प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर कीर्तनवाडी रोडवरील सर्व विद्युत पोलवर दिवे बसविण्यात आले आहेत. सणासुदीच्या दिवसांत संपूर्ण परिसर प्रकाशमय झाल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल गुहागर नगरपंचायत तसेच कीर्तनवाडी परिसरातील स्थानिक तीन नगरसेवकांचे तालुका सचिव प्रशांत साटले यांनी मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही शहरातील विकासकामांसाठी नगरपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींचे असेच सकारात्मक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी मनसेचा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.