loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी तयार केलेले नारळी मोदक

देवगड (प्रतिनिधी) - पुणे येथील ‘कॉज टू कनेक्ट’ फाऊंडेशन या संस्थेतर्फे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात सुरू करण्यात आलेल्या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागातर्फे गणेशोत्सवानिमित्त नारळी मोदक तयार करण्याचा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः नारळी मोदक तयार करून त्यांच्या विक्रीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक पॅकिंगमधील नारळी मोदकांच्या विक्रीसाठी जामसंडे बसस्थानकाजवळ विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवर ६ मोदकांचे ८८ बॉक्स आणि ११ मोदकांचे ५१ बॉक्स आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अवघ्या दोन तासांत तब्बल ९ हजार रुपयांची विक्री करून आपल्या कौशल्याची आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची प्रभावी झलक दाखवून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘शिका, करा आणि अनुभवातून कौशल्य विकसित करा’ या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला. केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, स्वच्छता, अन्न प्रक्रिया, आकर्षक पॅकिंग, ग्राहकांशी संवाद, विक्री व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरलेला ‘नारळी मोदक’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, कौशल्यवर्धक आणि अनुभवसमृद्ध ठरला.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक मृत्युंजय मुणगेकर, पूर्वा घाडी, पराडकर, गणेश परब तसेच त्यांच्या सर्व टीमने मार्गदर्शन व सहकार्य केले. या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. अजितराव गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाला समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, ॲड अभिषेक गोगटे, सर्व संस्था प्रतिनिधी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या हातून तयार झालेले नारळी मोदक आणि त्यांची उत्स्फूर्त विक्री ही शाळेतील कौशल्याधारित शिक्षणाची यशस्वी फलश्रुती ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg