loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेची नवीन कार्यकारणी जाहीर

तळवडे : शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काकासाहेब पेडणेकर व माजी अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब बुगडे यांच्या समृद्ध विचारांचा वारसा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या तसेच पंचक्रोशीतील शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेच्या आगामी कार्यकाळासाठी विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक कार्याला अधिक व्यापक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी श्रीकृष्ण शंकर पेडणेकर, उपाध्यक्षपदी डॉ. भालचंद्र कांडरकर, सचिवपदी न्हानू उर्फ दादा विष्णू पेडणेकर, सहसचिवपदी भूषण लवू पेडणेकर, खजिनदारपदी सुरेश जगन्नाथ गावडे, तर अंतर्गत हिशोब तपासणीसपदी संतोष विठ्ठल सावंत यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणी सदस्य म्हणून विजय कृष्णाजी बुगडे, उमाकांत काशिनाथ भगत, विजय बापूजी फेंद्रे, बाबुराव दत्ताराम गोडकर, देवेश शिवराम कावळे आणि शंकर संभाजी साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. भरत मधुकर बुगडे, वसंत रघुनाथ कांडरकर आणि हरिश्चंद्र गंगाराम काजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सल्लागारपदी प्रा. दिलीप दत्ताराम गोडकर, सच्चिदानंद मधुकर बुगडे, शशिकांत मधुकर रेडकर आणि विठोबा मोहन पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

नवनिर्वाचित कार्यकारणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन कार्यकारणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, स्वीकृत सदस्य व सल्लागारांचे सर्व शिक्षणप्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg