देवळे (प्रकाश चाळके) - दाभोळे येथील ग्राम महसूल कार्यालयाचा कारभार तसेच महसूल सेवक यांच्या कामकाजाविरोधात बाजारपेठ, दाभोळे येथील रहिवासी सचिन शामगोंडा पाटील यांनी १८ सप्टेंबरपासून तलाठी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केले आहे. ‘दाभोळे तलाठी कार्यालय आहे तरी कुठे? महसूल खाते काय करतंय?’ असा संतप्त सवाल उपस्थित करणारा फलक लावत पाटील यांनी प्रशासकीय अनास्थेकडे लक्ष वेधले होते.
महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचा तसेच दाभोळे तलाठी कार्यालयाच्या कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला होता. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत संगमेश्वर नायब तहसीलदारांनी १९ सप्टेंबर रोजी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले. दाभोळे महसूल सेवक यांच्याविरोधातील लेखी अथवा व्हिडिओ स्वरूपातील तक्रारी २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष तहसीलदारांसमोर सादर करण्याचे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत. तसेच दाभोळे तलाठी कार्यालयाशी संबंधित प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नायब तहसीलदार गिरी, सर्कल हिरोळे यांनी सुरू असलेले बेमुदत उपोषण तातडीने स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सचिन पाटील यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, आपल्या तक्रारीप्रमाणे कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच दाभोळे गावातील गावकर गणपत बेलकर उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.