loader
Breaking News
Breaking News
Foto

बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न; झरे-काजूळवाडी मार्ग धोकादायक

तिलारी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच झरे-काजूळवाडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांच्या अडचणीत भर घालत आहे. झरेबांबर गावठाण ते खोक्रल या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरील प्रवास जिकिरीचा आणि धोकादायक बनला आहे. या मार्गावरून पिकुळे, खोक्रल, मांगेली तसेच उसप परिसरातील नागरिकांची नियमित वाहतूक सुरू असते. गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा होते. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून गणेशभक्तांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः झरेबांबर गावठाण ते खोक्रल या मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने धोका आणखी वाढला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या आगमनासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने तयारी करत असताना, त्यांच्या वाटेत रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘विघ्न’ उभे राहिले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि गणेशमूर्तींची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी आवश्यक ती डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात तरी प्रशासनाने या मार्गाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg