loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आरती

खेड - माजी मंत्री रामदास कदम यांच्या खेड येथील निवासस्थानी गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी रामदास कदम, त्यांच्या पत्नी ज्योती कदम तसेच संपूर्ण कदम परिवाराने गणरायाचे विधिवत पूजन केले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. संपूर्ण कदम परिवाराने भक्तिभावाने बाप्पाची आरती करून गणरायाचे आशीर्वाद घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कदम कुटुंबीयांकडून पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे कदम यांच्या निवासस्थानी सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg