loader
Breaking News
Breaking News
Foto

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या जयघोषात गणरायाला निरोप

खेड रत्नागिरी (बाळू सनगरे) :कोकणातील गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा आता विसर्जनाच्या टप्प्यावर आला आहे.आज सात दिवसांच्या गौरी-गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला.गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी नदी, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांवर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.दरम्यान, विसर्जनावेळी काही भागात हलक्या पावसाच्या सरीही बरसल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डोळ्यांत भावुकता आणि ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.भक्ती, उत्साह आणि भावनिक वातावरणात कोकणातील सात दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg