loader
Breaking News
Breaking News
Foto

घरात आई-वडील नसताना बाहेरून आलेल्या इसमाकडून तरुणीवर अत्याचार, वैभववाडी तालुक्यात संताप

वैभववाडी ( प्रतिनिधी ) : वैभववाडी तालुक्यातील एका गावात घरात आई-वडील नसताना 45 वर्षीय इसमाने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यातील जनतेत संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की सदर इसम दशरथ आत्माराम बोलये , वय 45, राहणार जांभवडे याचे विरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. 15 सप्टेंबर रोजी पीडीतेचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्याचा फायदा घेऊन दुपारी 12 वाजता संशयित आरोपी घरी आला त्याने तरुणीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पिढीचा घाबरून घरभर पळत असतानाच नराधम संशयित तरुणाने पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार फिर्यादीतर्फे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. वैभववाडी पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन संशयित आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. सदर इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg