loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनिया गांधींच्या नागरिकताबाबत निम्न न्यायालयाचा आदेश दिल्ली न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली - सोनिया गांधी यांचे नाव नागरिकता मिळण्याच्या तीन वर्ष अगोदर मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या आरोपांची पुन्हा चौकशी होवू शकते. दिल्लीच्या एका न्याायलयाने दिलेल्या आदेशाला रद्द करण्यात आले आहे. न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात सोनिया गांधी यांची नागरिकता मिळण्याच्या तीन वर्ष अगोदर मतदाता यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याच्या आरोपाबाबत चौकशीला नकार दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिल्लीच्या द्वारका न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे की, न्यायालयाचा आदेश कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय घेण्यात आला होता. यावरुन माहिती होते की, या प्रकरणाबाबत योग्य विचार केलेला नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायमूर्तींच्या आदेशामध्ये तक्रारीला अपूर्ण दाखविण्यात आले आणि त्यामध्ये कायद्याने स्पष्ट चूक होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने एक याचिका रद्द केली होती. त्यात म्हटले होते की, १९८० मध्ये नागरिकता घेण्याच्या ३ वर्ष अगोदर सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने सामूहिक करण्यात आले होते. ही तक्रार अ‍ॅड. विकास त्रिपाठी यांनी केली होती. ज्या सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकिल पवन नारंग यांनी त्याचे सादरीकरण केले होते.

टाइम्स स्पेशल

द्वारका न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती विशाल गोग्रे यांनी म्हटले आहे की, हा आदेश पूर्ण पद्धतीने निरर्थक होता. या प्रकरणाला २९ सप्टेंबरला एसीजेएम समोर सादर केले जाईल. न्यायमूर्ती विशाल गोग्रे यांनी म्हटले आहे की, न्यायिक आदेशासाठी कायद्याला सर्वपरी मानण्यात येते आणि कोणत्याही आदेशाचे तथ्य पाहूनच त्याबाबत निर्णय घेतला जातो. मतदार यादीत मतदाराचे नाव किंवा गैरनागरिकाचे नाव धोकाधडीने सामील करण्याच्या आरोपासाठी काय त्यात तथ्य आहे, हे पहायला हवे. विवादित आदेशात याची चर्चा झाली नाही की, १९८०,१९८२ आणि १९८३ च्या मतदार यादीत कोणत्या क्रमाने नाव समाविष्ट केले किंवा हटविले याची माहिती नाही. न्यायमूर्तींनी म्हटले आहे की, एफआयआर दाखल करण्याच्या निर्णय देण्याऐवजी मॅजिस्ट्रेट यांचा आदेश नागरिकतेच्या मुद्यावर भटकला. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाला मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे परत पाठविले. त्यांनी आता ठोस कारणांसह आदेश जारी करावेत किंवा याबाबत सुनावणीचा निर्देश द्यावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg