loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाणीजधाम येथे घेतले गणरायाचे दर्शन

नाणीजधाम( वार्ताहर):महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील नाथांचे माहेर आश्रमात विराजमान झालेल्या गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जपली जात आहे. यंदाही नाणीजधाम येथे पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंत्री डॉ. उदय सामंत यांचे नाणीजधाम येथील नाथांचे माहेर आश्रमात आगमन झाल्यानंतर रामानंद संप्रदायाच्या दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. उदय सामंत यांनी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्याशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर डॉ. उदय सामंत यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह नाणीजधामच्या गणरायाचे दर्शन घेतले

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg